dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

महापुरामुळे पृथ्वीला धोका, भारतीय संरक्षण खात्यावर ताण, शेतीचे नुकसान; ‘भेंडवळ’च्या अंदाजात बरच काही..! | ‘Bhendwal’ is predicted

  ‘Bhendwal’ is predicted :  बुलढाणा जिल्ह्यातील 370 वर्षांची परंपरा लाभलेल्या जळगाव जामोद तालुक्यामधील भेंडवळ येथील प्रसिद्ध घटमांडणीचे भाकीत 20 एप्रिल रोजी पहाटे जाहीर करण्यात आले.  चंद्रभान महाराजांचे वंशज सारंगधर महाराज वाघ आणि पुंजाजी महाराज वाघ यांनी हे जाहीर केले आहे. 

अनुप गवळी/जळगाव जामोद :   बुलढाणा जिल्ह्यातील 370 वर्षांची परंपरा लाभलेल्या जळगाव जामोद तालुक्यामधील भेंडवळ येथील प्रसिद्ध घटमांडणीचे भाकीत 20 एप्रिल रोजी पहाटे जाहीर करण्यात आले.  चंद्रभान महाराजांचे वंशज सारंगधर महाराज वाघ आणि पुंजाजी महाराज वाघ यांनी हे जाहीर केले आहे. 

घट मांडणीच्या भाकितानुसार यावर्षी पिकांची भरपूर प्रमाणात नासाडी दर्शविण्यात आली असून देशात रोगराईचे प्रमाण सुद्धा अधिक दाखवण्यात आले आहे. याचबरोबर मानसूनमध्ये पहिल्या महिन्यामध्ये सर्वसाधारण असणार असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती दर्शविण्यात आली आहे. याचबरोबर पिकांच्या नासाडीमुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान होणार असून या नुकसानीमुळे देशाला आर्थिक फटका सुद्धा बसणार असून देशाची अर्थव्यवस्था सुद्धा कमकुवत राहणार असल्याचे भाकीत या ठिकाणी सारंगधर महाराज वाघ आणि पुंजाजी महाराज वाघ यांनी व्यक्त केले आहे. देशाचा राजा कायम राहणार असून संरक्षण खात्यावर मात्र ताण निर्माण होणार आहे. याचबरोबर देशातील अतिवृष्टी अवकाळी पाऊस महापूर परिस्थितीमुळे पृथ्वीला धोका निर्माण होणार असून नासाडी सुद्धा होणार आहे. 370 वर्षापासून परंपरा असलेली भेंडवळची घटमांडणीचे भाकित ऐकण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भ मराठवाडा आणि मध्य प्रदेश येथून सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी कृषी क्षेत्रातील विविध कंपन्या आणि व्यावसायिक या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top