Shyam Manav : राज्यात ‘खरात’ प्रकरण धुमाकुळ घालत असताना अनेक भोंदूबाबा उघडे पडत आहेत. तत्पूर्वी, अनेक वर्षांपासून जादूटोणा आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी श्याम मानव यांच्या नेतृत्वात अंधश्रध्दा निर्मूलन समिती काम करते आहे. खरात प्रकरणाच्या संदर्भाने अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरुद्ध विज्ञानवाद दृष्टिकोन रुजवण्यासाठी ‘अनिस’ ने राज्यभरात प्रचार प्रसार दौरे वाढवले असून, आज २० एप्रिलला श्याम मानव हे बुलढाणा दौऱ्यावर आहेत.

श्याम मानव यांचा खळबळजनक आरोप
अभिषेक वरपे/ बुलढाणा : राज्यात ‘खरात’ प्रकरण धुमाकुळ घालत असताना अनेक भोंदूबाबा उघडे पडत आहेत. तत्पूर्वी, अनेक वर्षांपासून जादूटोणा आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी श्याम मानव यांच्या नेतृत्वात अंधश्रध्दा निर्मूलन समिती काम करते आहे. खरात प्रकरणाच्या संदर्भाने अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरुद्ध विज्ञानवाद दृष्टिकोन रुजवण्यासाठी ‘अनिस’ ने राज्यभरात प्रचार प्रसार दौरे वाढवले असून, आज २० एप्रिलला श्याम मानव हे बुलढाणा दौऱ्यावर आहेत. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना, भोंदूगिरी, जादूटोणा यासंदर्भात मत मांडत असताना श्याम मानव यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक खळबळ जनक किस्सा सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
श्याम मानव म्हणाले, २०१३ मध्ये अंधश्रद्धा व जादूटोणा विरुद्ध कायदा निर्माण झाला. त्यानंतर २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. अंधश्रद्धा निर्मूलनच्या
महत्त्वपूर्ण कामासाठी राज्य शासनातर्फे एक समिती देखील नेमण्यात आली होती. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामकाजासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क झाला. यावेळी, कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी, ‘अनिस’ सातत्याने काम करत राहिली आणि आहे.. मात्र त्यावेळी, यासाठी लागणारा निधी देण्याकरिता फडणवीसांनी आधी सहकार्याची भूमिका दाखवली होती परंतु, नंतर पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. मी अनेकदा फडणवीस यांच्याकडे चकरा मारत राहिलो, मात्र त्यांनी केवळ झुलवलं.. काँग्रेसच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रचार प्रसारच्या कामासाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा आला नाही मात्र, फडणवीसांनी झुलवत ठेवल्याचा आरोप करत एका भाजप नगरसेवकानी एका प्रकरणात हस्तक्षेप देखील केल्याचे श्याम मानव यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी अंधश्रद्धा वाढविण्याचे काम केलं म्हणून खरात सारखे प्रकरण घडले असाही त्यांनी आरोप केला.


