गुंगीकारक औषधीचा साठा करुन विक्री करणाऱ्या टोळीतील पाच जण गजाआड; गुन्हेशाखा पोलिसांनी जप्त केला 12 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल

छत्रपती संभाजीनगर : नशेसाठी गुंगीकारक औषधीचा साठा करुन विक्री करणाऱ्या टोळीतील पाच जणांना गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले. अटकेत असलेल्या पाच जणांच्या ताब्यातून पोलिसांनी 12 लाख रुपये किंमतीच्या 300 गुंगीकारक औषधीच्या बाटल्या, 45 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल, रोख रक्कम 1 हजार 700 रुपये असा एकूण 12 लाख 46 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी बुधवार, 4 फेब्रुवारी रोजी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओबेदुल्ला अब्दुल्ला (32 वर्ष), रा. रहेमानिया कॉलनी, शेख सोफियान शेख नजीर (34 वर्ष), रा. बायजीपुरा, अब्दुल नवीद खान अब्दुल समी खान (31 वर्ष), रा. खासगेट, जिन्सी परिसर, शेख नावेद शेख हमीद (25 वर्ष), रा. कॅप्टन कलेक्शनजवळ, फाजलपुरा, शेख आयान उर्फ शेरु शेख सिराज (42 वर्ष), रा. हज हाऊस जवळ, किलेअर्क अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची नावे आहेत. किराडपुरा परिसरातील रहेमानिया कॉलनी येथे राहणाऱ्या ओबेदुल्ला अब्दुल्ला याच्याकडे नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गुंगीकारक औषधीचा साठा असून तो विक्री करीत असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती.

गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, गुन्हेशाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक प्रविण वाघ, अर्जुन कदम, अभिजित चिखलीकर, पोलिस अंमलदार योगेश नवसारे, विजय कदम, योगेश गुप्ता, श्रीकांत काळे, राजेश यदमळ, राहुल बंगाळे, जालिंदर गोरे, विक्रम खंडागळे, शेख शाहरुख, रोहीत जाधव, अक्षय नाटकर, प्रतिक साबळे, अभिषेक बाठे, अभिषेक राऊत, महिला पोलिस अंमलदार माया माळी, मनिषा नरोडे, संतोष चौरे आदींच्या पथकाने ओबेदुल्ला अब्दुल्ला याच्या घरावर छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी त्याच्या घरातून गुंगीकारक औषधीच्या 12 लाख रुपये किंमतीच्या 300 बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »