जालना : शेतकऱ्याचे अपहरण करुन त्यास 25 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच दरोडेखोरांना रविवार, 30 मार्च रोजी मौजपुरी ( ता. जालना ) पोलिसांनी जेरबंद केले.

जालना : शेतकऱ्याचे अपहरण करुन त्यास 25 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच दरोडेखोरांना रविवार, 30 मार्च रोजी मौजपुरी ( ता. जालना ) पोलिसांनी जेरबंद केले.
या प्रकरणी मौजपुरी येथील शेतकरी फिर्यादी निवृत्ती तांगडे ( रा.धानोरा ता.जि. जालना ) यांनी तक्रार दिली होती. 22 मार्च रोजी रात्री 1.30 वाजेच्या सुमारास ते धानोरा येथील त्यांच्या राहत्या घराच्या बाहेर झोपलेले असताना पाच ते सात अज्ञात चोरट्यांनी त्यांचे तोंड दाबून गाडीमध्ये टाकून जालना शहराच्या दिशेने घेऊन गेले. त्यांच्या खिशातील 15 हजार रुपये काढून घेऊन त्यांना जीवे न मारता सोडून देण्यासाठी 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. निवृत्ती तांगडे घाबरलेले असल्याने दरोडेखोरांना खंडणी म्हणून 25 लाख रुपये देण्याचे मान्य केल्याने त्यांना मौजे घोडेगाव फाटा येथे रात्री आणून सोडण्यात आले.
त्यानंतर दरोडेखोरांनी तांगडे यांना फोनवर संपर्क करुन 25 लाख रुपये दे, अन्यथा कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तांगडे यांनी मौजपूरी पोलिसांत तक्रार दिली. पोलीसांनी
गुन्हा दाखल केला. आला होता. डुकरी पिंपरी टोलनाका येथील सीसीटिव्ही फुटेज तपासून दरोडेखोरांना शोधून काढले.गणेश तात्याराव श्रीखंडे, रामप्रसाद ऊर्फ बाळु डिगांबर शिंदे दोघे रा. सावरगाव हडप, आकाश अशोक घुले रा. मुकींदपुर, नेवासा फाटा जि. अहिल्यानगर, विशाल ऊर्फ गजानन डोंगरे रा. सावरगाव हडप, आकाश तुकाराम रंधवे यांना अटक कऱण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, पोउपनि विजय तडवी, चंद्रकांत पवार, ज्ञानोबा बिरादार, मच्छिद्र वाघ, दिलीप गोडबोले, नितीन खरात, राजेंद्र देशमुख, भास्कर वाघ, सतिष गोफणे, नितीन कोकणे, प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे, धोंडीराम वाघमारे, प्रशांत म्हस्के, सदाशिव खैरे, कैलास शिवणकर यांनी केली.