Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील दोन युवकांना गोरेगाव मुंबई पोलीसांनी अटक केली आहे.
बुलढाणा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील दोन युवकांना गोरेगाव मुंबई पोलीसांनी अटक केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडून दिले जाईल अशी धमकी गुरुवारी मुंबईतील काही पोलीस ठाणे आणि मंत्रालय ई-मेल द्वारे प्राप्त झाली होती. यानंतर लगेच मुंबई पोलीस. एटीएस पथक सक्रिय झाली. गुरुवारी रात्री प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोष महाले सहाय्यक पोलीस निरीक्षक हिम्मत शिंदे व मुंबई एटीएस पथक जळगाव येथे धडकली. ई-मेल आयडी ऍड्रेस वरून अभय शिंगणे वय 25 वय मंगेश वायाळ दोघे राहणार देऊळगाव मही यांना ताब्यात घेतले. दोघा आरोपींना अटक करून पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. आहे. एटीएस पथकाने अटक केलेल्या अभय शिंगणे यांचे जळगाव येथे मुख्य रस्त्यावर मोबाईल रिपेरिंग चे दुकान आहे तर मंगेश वायर हा ट्रक चालक आहे.,ई-मेल द्वारे धमकी देणाऱ्या आरोपीची पार्श्वभूमी तपासल्यानंतर धमकी देण्याचे कारण उघडकीस येणार आहे. दोन्ही आरोपी एकमेंकांचे नातेवाईक असून मामेभाऊ आत्या भाऊ आहे अभय शिंगणे यांचे मोबाईल शॉपी असून मंगेश ट्रक चालक आहे. मंगेश वायाळ याने अभयाच्या मोबाईल शॉपी मोबाईल चार्जिंगला लावला होता. तिथूनच दम किती ईमेल पाठवण्यात आले विशेष म्हणजे मंगेशच्या आयडीवरून सीन होणारे पहिलीच ईमेल आहे.