The occasion of the revelation day : “गजानन अवलिया अवतरले जग ताराया”;  प्रगटदिनानिमित्त शेगावात भक्तांची मांदीयाळी

The occasion of the revelation day

The occasion of the revelation day : विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री संत गजानन महाराज यांचा 147 वा प्रगट दिन उत्सव संतनगरी शेगाव मध्ये 20 फेब्रुवारी रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत गण गण गणात बोते च्या गजरात अतिशय भक्तिमय वातावणात साजरा करण्यात आला. प्रगट दिनानिमित्त श्रीं संस्थानकडून 19 व 20 फेब्रुवारी रोजी भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे दोन दिवसात सुमारे दोन लाख भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.

The occasion of the revelation day

अनुप गवळी / शेगाव :  विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री संत गजानन महाराज यांचा 147 वा प्रगट दिन उत्सव संतनगरी शेगाव मध्ये 20 फेब्रुवारी रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत गण गण गणात बोते च्या गजरात अतिशय भक्तिमय वातावणात साजरा करण्यात आला. प्रगट दिनानिमित्त श्रीं संस्थानकडून 19 व 20 फेब्रुवारी रोजी भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे दोन दिवसात सुमारे दोन लाख भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.
श्रीं संत गजानन महाराजांच्या प्रगटदिन उत्सवानिमित्त राज्यभरातून शेकडो भजनी दिंड्या प्रगट दिनानिमित्त शेगावमध्ये दाखल झाल्या. श्रींचे मंदिरात गेल्या सप्ताहभरापासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे. भावीक भक्तांची गर्दी लक्षात घेऊन श्री संस्थानकडून प्रगट दिन निमित्ताने दोन दिवस मंदिर रात्रभर दर्शनासाठी भक्तांना खुले ठेवण्यात आले. बुधवार 19 फेब्रुवारी च्या संध्याकाळपर्यंत 840 च्या वर भजनी दिंड्या दाखल झाल्या होत्या व रात्री उशिरापर्यंत दिंड्या येण्याचा ओघ सुरूच होता. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता श्री महारुद्र स्वाहाकार यागाने श्रींचा प्रगट दिन उत्सवाला प्रारंभ झाला. दरम्यान भक्तिमय व मंगलमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. श्रींच्या प्रकट दिन उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सर्वत्र केळीचे खांब लावण्यात आले असून आंब्याच्या पानाचे तोरण लावण्यात आलेत. सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. श्रींच्या नाम घोषात वारकरी व भक्त तल्लीन झालेले दिसत आहेत. भजनी दिंड्यांच्या टाळ मृदंगाचे गजराने संतनगरी दुमदुमून गेली आहे. श्री मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होईल हे लक्षात घेता व काही अप्रिय घटना घडू नये. याची दक्षता म्हणून वन-वे (एकेरी मार्ग) करण्यात आला आहे. त्यात श्रींची समाधी दर्शन व्यवस्था, मुखदर्शन व्यवस्था, महाप्रसाद, पारायण कक्ष मंडप, इत्यादी व्यवस्था करण्यात आली होती.

पालखीचा परिक्रमा आणि काल्याचे किर्तनाने सोहळ्याची सांगता

श्री प्रगटदिन उत्सवानिमित्त श्रींची पालखी परिक्रमा अश्व व भजनी दिंडीसह दुपारी 4 वाजता श्री पालखी परिक्रमा मंदिर परिसरातील सेवाधारी प्रसादालय जवळील उत्तर द्वारातून प्रस्थान करणार आहे. सदर पालखी महात्मा फुले बँके समोरून, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौकातून, श्री संत सावता माळी चौक, श्री हरिहर मंदिर जवळून, भीम नगर (तीन पुतळा परिसर), शाळा नं. 2 (सावित्रीबाई फुले चौक), फुले नगरातून, श्री प्रगटस्थळ जवळून, सितामाता मंदिर, लायब्ररी जवळून (श्री गर्गाचार्य मंदिरा समोरून), पश्चिम गेटमधून श्री मंदिर परिसरामध्ये सायं. 6 वाजताचे परत येईल. तसेच 21 फेब्रुवारी रोजी मंदिरात सकाळी काल्याचे किर्तननाने प्रगटदिन सोहळ्याची सांगता होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »