धावडा : वणी, जिल्हा यवतमाळ येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. करमसिंग राजपूत यांची महाराष्ट्रातील ख्यातनाम श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमरावती वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी निवड झाली आहे. ते भोकरदन तालुक्यातील वाढोणा येथील भूमिपुत्र व येथील जिल्हा परिषद हायस्कुलचे माजी विद्यार्थी आहे. या निवडीबद्दल त्यांचा धावडा ग्रामस्थांच्या वतीने सोमवार, 3 नोव्हेंबर रोजी सत्कार करण्यात आला.

प्रा.डॉ. राजपूत मागील 30 वर्षांपासून वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. राजपूत यांचे तब्बल 15 पुस्तके प्रकाशित झालेली असून ती सर्व पुस्तके संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठामध्ये त्यांची पुस्तके संदर्भ ग्रंथ म्हणून वापरली जातात. याशिवाय डॉ. राजपूत यांची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जरर्नलसमध्ये तब्बल 105 शोधनिबंध प्रकाशित झालेले असून आत्तापर्यंत त्यांनी 75 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व इतर परिषदांमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम व परिषदेचे आयोजन केलेले आहे. त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात एक कृषी आदर्श कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणून परिचय आहेत. त्यांनी महाराष्ट्रतील ख्यातनाम व्याख्यानमालामध्ये विविध विषयांवर व्याख्याने दिलेली आहेत. त्यांची श्री शिवाजी शिक्षण संस्थेत प्राचार्य म्हणून निवड झाल्याने त्यांच्या मुळगावी वाढोणा व धावडा येथे सोमवारी समता सार्वजनिक वाचनालय व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष सय्यद गयासुदिन, पदमसिंह राजपूत, धावडा येथील त्यांचे वर्गमीञ तथा व्यापारी खालेद पठाण, वाढोणा येथील शेतकरी किसन गव्हाणे, सय्यद हफीज व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.