महादेव मंदीर डोंगरावरुन २०० फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला:  दोन ठार, तर १३ जण जखमी

वैजापूर :  भाविकांना घेवून परतणाऱ्या भाविकांची ट्रॅक्टर-ट्रॉली डोंगरावरुन खाली 200 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला. तर 13 भाविक जखमी झाले. हा अपघात नांदगाव तालुक्यातील जातेगावजवळ असलेल्या पिनाकेश्वर महादेव घाटात रविवार, 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडला.

कांताबाई नारायण गायके (५६ वर्ष), रा. खामगाव, ता. कन्नड, कमलबाई शामराव जगदाळे (६२ वर्ष), रा. जानेफळ, ता. वैजापूर या महिला भाविकांचा या अपघातात मृत्यू झाला. तर चेतन प्रकाश कवडे, प्रणिता प्रकाश कवडे, माया प्रकाश कवडे, अप्पा सोपान राऊत, श्रावणी अप्पा राऊत, कल्याणी राजेंद्र कवडे, साई कवडे, प्रगती सोमनाथ नवले, आणि आदित्य योगेश कवडे हे भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अंमलदार भास्कर बस्ते,परमेश्वर श्रीखंडे, होमगार्ड ऋषिकेश पठाडे, गणेश इप्पर यांनी मदतकार्यात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »