dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

ओंकारेश्वर ते गौरीशंकर महादेव मंदिर कावड यात्रा बुधवारी जाफ्राबादेत

जाफ्राबाद  :  मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर महादेव मंदिरापासून निघालेली ओंकारेश्वर ते गौरीशंकर महादेव मंदिर कावड यात्रा येत्या बुधवार, 20 ऑगस्ट रोजी जाफ्राबाद शहरात दाखल होणार आहे. तब्बल 311 किलोमीटर लांबीची ही पायी कावड यात्रा असून जालना जिल्ह्यातील सर्वात मोठी कावड यात्रा आहे.

शिवस्वरूप जनार्दन स्वामी महाराज, माधवगिरी बाबा, महेशगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने शिवस्वरूप जनार्दन स्वामी महाराज कावड यात्रा मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर महादेवाचे दर्शन व नर्मदा नदीचे जल घेऊन १० ऑगस्ट रोजी ओंकारेश्वर येथून निघाली असून ही कावड यात्रा  २० ऑगस्ट रोजी जाफ्राबाद शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकात दाखल होणार आहे. यावेळी डीजेच्या दणदणाटात कावड यात्रेचे स्वागत करुन गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. कावड यात्रेत जाफ्राबाद तालुक्यातील संत जनार्दन स्वामी भक्त परिवाराचे विशाल दांडगे, नारायण पोटे, रमेश वाघमारे, साहेबराव अंभोरे, राहुल पवार, दगडूबा शेळके आदींचा सहभाग आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top