dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

श्री त्रंबकेश्वर महाराजांच्या दर्शनाला काकनवाडा बुद्रुक येथे भक्तांची ओढ;  संग्रामपूर तालुक्यातील जागरूक तीर्थक्षेत्र श्री त्रंबकेश्वर महाराज काकणवाडा बु.

संग्रामपूर – तालुक्यातील जागरूक तीर्थक्षेत्र श्री त्रंबकेश्वर महाराज काकणवाडा बु. येथे श्रावण उत्सवानिमित्त संपूर्ण श्रावण महिन्या मध्ये रात्री आठ वाजता शिवमहापुराण ग्रंथाचे श्रवण केल्या जात असते. तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी संग्रामपूर तालुक्यातील नव्हे जळगाव जामोद तालुक्यामधील तसेच अकोला मधील तेल्हारा माळेगाव बाजार येथून बहुसंख्य संख्येने भाविकांच्या 50 भजनी दिंड्या आणि 5 कावडधारी मंडळांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची प्रतिकृतीचे दर्शनाकरिता काकनवाडा बुद्रुक नगरीमध्ये आगमन होते. 

संग्रामपूर – तालुक्यातील जागरूक तीर्थक्षेत्र श्री त्रंबकेश्वर महाराज काकणवाडा बु. येथे श्रावण उत्सवानिमित्त संपूर्ण श्रावण महिन्या मध्ये रात्री आठ वाजता शिवमहापुराण ग्रंथाचे श्रवण केल्या जात असते. तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी संग्रामपूर तालुक्यातील नव्हे जळगाव जामोद तालुक्यामधील तसेच अकोला मधील तेल्हारा माळेगाव बाजार येथून बहुसंख्य संख्येने भाविकांच्या 50 भजनी दिंड्या आणि 5 कावडधारी मंडळांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची प्रतिकृतीचे दर्शनाकरिता काकनवाडा बुद्रुक नगरीमध्ये आगमन होते. यावेळी हर हर महादेव च्या गजरात तिर्थनगरी दुमदुमते. काकनवाडा बु. येथील बळवंत केशव देशपांडे भक्ताच्या नाशिक त्र्यंबकेश्वर अखंड वारीची फळ प्राप्ती असल्याची अख्यांकिका आहे. 

दरवर्षी होतो भाविकांना महाप्रसादाचे वितरण

गत अनेक वर्षापासून येथे श्रावण महिन्यातील दर सोमवारी अभिषेक, पुजा, भजन, किर्तन आदी कार्यक्रम भाविकांकडून सुरू आहे. त्या अनुषंगाने सोमवारी पंचक्रोशीसह इतर भागातील शिवभक्तांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला जातो. भाविकांसाठी 21 क्विंटल गव्हाच्या पोळ्या, वरण, भात, भाजी, शिरा असा महाप्रसाद बनवून वितरण करण्यात येते. दरम्यान जयभोलेचा गजर, वाद्यांच्या तालावर थिरकणारी तरुणाई थिरकत खांद्यावरील कावळ घेऊन शिवभक्त पुढे शिवभक्तांकडन करण्यात येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top