Cowshed fire in Nilajgaon :निलजगाव येथे गोठ्याला आग,  पाच जनावरांचा होरपळून मृत्यू

Cowshed fire in Nilajgaon

Cowshed fire in Nilajgaon : शॉर्टसर्कीटने अचानकपणे गोठयाला आग लागून पाच जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना पैठण तालुक्यातील निलजगाव येथे रविवार, 27 ऑक्टोबर रोजी घडली.

Cowshed fire in Nilajgaon

बिडकीन :  शॉर्टसर्कीटने अचानकपणे गोठयाला आग लागून पाच जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना पैठण तालुक्यातील निलजगाव येथे रविवार, 27 ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेत पाच जनावरांसह शेतीउपयोगी अवजारेही जळून खाक झाली असून जवळपास 5 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
निलजगाव येथील शेतकरी भाऊसाहेब मल्हारराव मोगल (६०) वर्ष,रा.निलजगाव,ता.पैठण यांची शेतातील गोठ्याला विद्दूत शॉर्टसर्किट झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  निलजगाव ते बिडकीन रोडवरील पुलाजवळ यांची शेती आहे. स्थानिक नागरिकांनी आग लागलेली माहिती बिडकीन पोलीसांना दिली, घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार महादेव निकाळजे व सहायक फौजदार जगन्नाथ उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत नागरिकांच्या मदतीने आग विझवली. गोठ्यामध्ये असलेले २ बैल, १ जर्सी गाय, २ पिल्ले, होरपळून मृत्यू झाले. तर २० क्विंटल कापूस, कडबा चारा, शेती उपयोगी अवजारे असा एकुण 5 लाख रुपयांचे नुकसान झाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »