dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

PM Modi honour Cyprus’ highest civilian : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

PM Modi honour Cyprus’ highest civilian : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी सायप्रसमधील ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस (3) हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. सायप्रस प्रजासत्ताकाचे पहिले अध्यक्ष मकारिओस यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्‍कार राष्ट्राच्या प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रप्रमुख आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना प्रदान केला जातो.

PM Modi honour Cyprus' highest civilian

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी सायप्रसमधील ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस (3) हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. सायप्रस प्रजासत्ताकाचे पहिले अध्यक्ष मकारिओस यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्‍कार राष्ट्राच्या प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रप्रमुख आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना प्रदान केला जातो.
निकोसिया येथील राष्ट्रपती निवासस्‍थानी सोमवारी झालेल्‍या कार्यक्रमात सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्‍कार प्रदान केला. या सन्‍मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी क्रिस्टोडोलाइड्स यांच्‍यासह सायप्रसच्या जनतेचे आभार मानले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, “सायप्रसमधील सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस या पुरस्‍काराने माझा सन्‍मान करण्‍यात आला याबद्‍दल मी सायप्रस सरकारचे आणि जनतेचे मनापासून आभार मानतो. हा सन्मान फक्त माझा नाही, तर १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. हा त्यांच्या क्षमता आणि आकांक्षांचा सन्मान आहे. हा आपल्या देशाच्या सांस्कृतिक बंधुत्वाचा आणि “वसुधैव कुटुंबकम” च्या विचारसरणीचा सन्मान आहे. मी हा सन्मान भारत आणि सायप्रसमधील मैत्रीपूर्ण संबंधांना आणि आपल्या सामायिक मूल्यांना आणि परस्पर समंजसपणाला समर्पित करतो. सर्व भारतीयांच्या वतीने मी अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने हा सन्मान स्वीकारतो.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top