CISCE Board results declared : सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या ‘काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स’ (सीआयएससीई) इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या ‘काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स’ (सीआयएससीई) इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी वाढली आहे. विद्यार्थ्यांमधील अस्वास्थ्यकर स्पर्धा टाळण्यासाठी बोर्डाने यंदापासून गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रक्रिया थांबवली आहे.
सीआयएससीईच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 99.47 टक्के विद्यार्थी 10 वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, तर 98.19 टक्के विद्यार्थी 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी दहावीची उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.९४ टक्के तर बारावीची ९६.९३ टक्के इतकी होती. सीआयएससीईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिव जोसेफ इमॅन्युएल म्हणाले, इयत्ता 10 मध्ये 99.31 टक्के मुले उत्तीर्ण झाली, तर 99.65 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. त्याचप्रमाणे इयत्ता 12वीमध्ये मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 97.53 टक्के, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 98.92 टक्के आहे. सीबीएसईने गेल्या वर्षी या दोन बोर्ड वर्गांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रथा बंद केली होती. इयत्ता 10 मध्ये, इंडोनेशिया, सिंगापूर आणि दुबई येथील शाळांनी 100 च्या उत्तीर्णतेसह परदेशात सर्वोत्तम कामगिरी केली. 12 व्या वर्गात सिंगापूर आणि दुबईच्या शाळांनी परदेशात सर्वोत्तम कामगिरी केली. आयसीएसई परीक्षा (इयत्ता 10) 60 लेखी विषयांमध्ये घेण्यात आली होती, त्यापैकी 20 भारतीय भाषांमध्ये, 13 परदेशी भाषांमध्ये आणि एक शास्त्रीय भाषेत होती.
दहावीची उत्तीर्णतेची टक्केवारी
पश्चिम विभागात इयत्ता 10वीमध्ये उत्तीर्णतेची सर्वाधिक टक्केवारी (99.91) नोंदवली गेली. यानंतर सर्वाधिक उत्तीर्णतेची टक्केवारी (99.88) दक्षिण विभागात नोंदवली गेली. दक्षिण विभागात, सर्वाधिक 49.52 टक्के मुलींनी 10वी बोर्डाची परीक्षा दिली.
बारावीची उत्तीर्णतेची टक्केवारी
बारावीमध्ये दक्षिण विभागात सर्वाधिक उत्तीर्णतेची टक्केवारी (99.53) नोंदवली गेली. यानंतर पश्चिम विभागात सर्वाधिक उत्तीर्णतेची टक्केवारी (99.32) नोंदवली गेली. पश्चिम विभागात सर्वाधिक 50.55 टक्के मुलींनी 12वीची परीक्षा दिली.