मेहकर : रील बनविण्याच्या नादात खाजगी बस अनियंत्रित होवून उलटली. या भीषण अपघातात दिड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना समृद्धी मार्गावरील मेहकर टोलनाका येथे आज १९ एप्रिल रोजी सकाळी घडली.

मेहकर : रील बनविण्याच्या नादात खाजगी बस अनियंत्रित होवून उलटली. या भीषण अपघातात दिड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना समृद्धी मार्गावरील मेहकर टोलनाका येथे आज १९ एप्रिल रोजी सकाळी घडली.
महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून समृद्धी महामार्गाची ओळख आहे. परंतु, हा मार्ग अनेकांसाठी काळ ठरत असल्याचे दिसून आले आहे. याच महामार्गावर मोठ्या अपघातात एकाच वेळी तब्बल वीस पेक्षा अधिक जणांना प्राण गमवावे लागले होते. समृद्धी महामार्गावर अपघातांच्या घटना काही नवीन नाहीत, दरम्यान, १९ एप्रिलला सकाळी उघडकीस आलेल्या भीषण अपघातात दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. खाजगी लक्झरी बसमधील चालक आणि क्लिनर मेहकर येथील टोलनाका जवळ मोबाईल वर रिल बनवत असताना बस अनियंत्रित झाली आणि उलटली. पुढे येणाऱ्या चारचाकी वाहनाला बस आदलळी, त्यामुळे चार चाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले. घटनेनंतर तात्काळ परिसरातील नागरिकांना रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमींना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. या भीषण अपघातात दीड वर्षीय एका चिमुकल्याचा मृत्यु झाला तर वीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.