मुंबई : भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ यावर्षी जूनमध्ये संपत आहे. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच बीसीसीआयने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ आता वाढवण्यात आला आहे.

मुंबई : भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ यावर्षी जूनमध्ये संपत आहे. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच बीसीसीआयने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ आता वाढवण्यात आला आहे. मंडळाने त्यांचा करार नूतनीकरण करुन त्यांचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवला आहे. संघ निवडीमध्ये सातत्य राखण्यासाठी, २०२७ च्या वनडे विश्वचषक स्पर्धेला डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला. त्यांचा कार्यकाळ आतापासून एका वर्षासाठी, म्हणजेच जून २०२७ पर्यंत वाढवण्यात आला आहे.
पुढील वर्षीचा वनडे विश्वचषक ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे आयोजित होणार आहे. त्यामुळे, विश्वचषकापर्यंत आगरकर यांचा कार्यकाळ अजूनही वाढवला जाऊ शकतो. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आगरकर यांनी स्वतः मुदतवाढीची विनंती केली नव्हती. एक निवडकर्ता जास्तीत जास्त चार वर्षे काम करु शकतो, त्यामुळे त्याचा करार वाढवण्याऐवजी त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
आगरकर यांना नेहमीच वाटत होते, की त्यांचे भविष्य त्यांच्या कामगिरीवर अवलंबून असावे. आगरकर यांच्या कार्यकाळात टीम इंडियामध्ये एक सुरळीत स्थित्यंतर झाले आहे. वरिष्ठ आणि तरुण खेळाडूंमध्ये संतुलन साधण्यात आले आणि अनेक धाडसी निवड निर्णय घेण्यात आले, ज्यामळे संघाला एक नवीन दिशा मिळाली. यामुळेच त्यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आगरकर वनडेमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे भारतीय फलंदाज आहेत. त्यांनी २००० साली झिम्बाब्वेविरुद्ध २१ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.
आगरकर यांनी भारतासाठी वनडेमध्ये सर्वात जलद ५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यांनी २३ सामन्यांमध्ये हा पराक्रम केला होता. ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२६ दरम्यान त्यांनी निवडलेल्या भारतीय संघांनी चार आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. यापैकी भारताने तीन विजेतेपदे पटकावली. २०२४ आणि २०२६ मध्ये दोन टी-२० विश्वचषक आणि २०२५ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी.


