जालना : येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात शिवसेनेकांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ‘ग्यानबा तुकाराम.. आश्वासनांचे किती झाले काम..’, ‘भाऊ आणि दादा क्या हुआ तुम्हारा वादा..’ असे म्हणत सत्ताधारी पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जाब विचारण्यात आला.

जालना : येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात शिवसेनेकांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ‘ग्यानबा तुकाराम.. आश्वासनांचे किती झाले काम..’, ‘भाऊ आणि दादा क्या हुआ तुम्हारा वादा..’ असे म्हणत सत्ताधारी पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जाब विचारण्यात आला.
शनिवार, 7 जून रोजी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, बाबुराव पवार, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले, युवा सेनेचे भरत सांबरे, माजी नगरसेवक जे.के.चव्हाण, गंगुताई वानखेडे, संदीप नाईकवाडे, माजी जि.प.सदस्य बबनराव खरात, दलित आघाडीचे जिल्हासंघटक रविकांत जगधने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला.
अंबेकर म्हणाले की, निवडणूक काळात महायुतीच्या तिन्ही पक्षांनी दिलेली शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार, सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये देणार, लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार, 44 हजार गावात पानंद रस्ते बांधणार, शेतकऱ्यांच्या खते बियाणे यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवणार, त्यावरील एसजीएसटी अनुदान स्वरूपात वापस देणार, एक रुपयात पिक विमा देणार, वृद्धांना पेन्शन स्वरूपात 21 रुपये देणार, अन्नदात्याला ऊर्जात आता बनवून 24 तास वीज देणार, शेतमालाला हमीभाव देणार, हर घर जल हर घर छत देणार, मराठवाडा वॉटर ग्रीडला केंद्राकडून मान्यता घेणार, अशी अनेक आश्वासने दिली होती. मात्र दिलेल्या विविध आश्वासनांचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला असल्याचे सांगून “क्या हुआ तेरा वादा..? असा सवाल त्यांनी खोतकर यांच्यासमोर उपस्थित केला. राठवाडा ही संतांची भूमी आहे. संतांनी दिलेल्या वचनाप्रमाणे त्या काळातील राज्यकर्त्यांनी कारभार केला व जनतेला सुखी ठेवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आज मात्र असे होताना दिसत नाही. निवडणुका आल्यानंतर येथील जनतेला शेतकऱ्यांना भरपूर आश्वासने देऊन त्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. संतांनी सांगितल्याप्रमाने बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या अभंगाचा दाखला देऊन टाळ मृदुंगाच्या गजरात हे आंदोलन करण्यात आल्याचे अंबेकर म्हणाले.
खोतकर यांना निवेदन
निवडणुकीच्या काळात महायुतीच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याची आठवण करून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी भास्कर अंबेकर यांनी आमदार अर्जुन खोतकर यांना निवेदाद्वारे आश्वासनांची आठवण करून दिली.