Aurangabad Vidhan Sabha Constituency: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतरित्या पक्षाच्या पहिल्या यादीत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी अचानक उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतल्याने मध्य शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांची शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली.
छत्रपती संभाजीनगर : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतरित्या पक्षाच्या पहिल्या यादीत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी अचानक उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतल्याने मध्य शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांची शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली.
पक्षाला ऐनवेळी उमेदवारी माघार घेऊन अडचणीत आणल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने किशनचंद तनवाणी यांना शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे. तसेच सदरील जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सह संपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे व महानगरप्रमुख राजू वैद्य यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत असल्याची माहिती यावेळी दानवे यांनी दिली.