जिल्ह्यातील तीन धार्मिक स्थळांना ‘ब’ वर्ग तीर्थस्थळांचा दर्जा; राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाचा निर्णय 

बुलढाणा : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ’  योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन धार्मिक स्थळांना ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आला असून, यासंदर्भातील शासनआदेश आज 19 जून रोजी निर्गमित करण्यात आला आहे. यानिर्णयाने जिल्ह्याच्या आध्यात्मिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे,  दर्जा प्राप्त स्थळांना भौतिक सुविधांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त होणार आहे. 

 दर्जा देण्याच्या अनुषंगाने ग्राम विकास विभागाला अनेक प्रस्ताव मिळाले होते.  यासंदर्भाने 8 ऑक्टोबर 2024 रोजी  एका विशेष समितीपुढे नव्याने ‘ब’ दर्जा प्राप्त झालेल्या संस्थानांनी  निकषांची पूर्तता केली. यामध्ये,  चिखली तालुक्यातील गोंदरी येथील रेणुकादेवी संस्थान, बुलढाणा तालुक्यातील दुधा येथील श्री मर्दडी देवी संस्थान तसेच चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथील श्री सोमनाथ महाराज संस्थान या स्थळांचा समावेश आहे.  उपरोक्त प्रस्तावातील कागदपत्रांची तपासणी करित सदर धार्मिक स्थळांना ‘ब’ वर्गीय तीर्थस्थळ दर्जा प्रदान करण्यात आला आहे.  यामुळे, आगामी काळात या स्थळांचा विकास होण्यास मदत मिळणार आहे. भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »