शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

मुंबई : विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे. त्यांनी घडविलेली शिल्पे इतिहासाची साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिल्पकार राम सुतार यांचा गौरव केला.

शिल्पांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे. त्यांनी घडविलेली शिल्पे इतिहासाची साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिल्पकार राम सुतार यांचा गौरव केला.

शिल्पकार राम सुतार यांना  राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा  ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (२०२४) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नोएडा (उत्तर प्रदेश) येथील राम सुतार यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार महेश शर्मा, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा आदी उपस्थित होते.

शिल्पकला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल शिल्पकार राम सुतार यांना हा पुरस्कार देण्यात आला असून सन्मानचिन्ह, मानपत्र आणि  २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राम सुतार यांनी घडविलेली शिल्पे अतिशय परिपूर्ण असून जगभरात ती दिमाखात उभी आहेत. त्यांच्या विविध कलाकृती त्यांच्यातील श्रेष्ठ कलाकाराची साक्ष देतात. राम सुतार  यांच्या जीवनातील शिल्पांचे महत्व अलौकिक असून त्यांच्या असामान्य सृजनशीलतेचा अविष्कार अनेक कलाकृतींमधून अनुभवयाला मिळतो. राम सुतार यांच्या मनात महाराष्ट्र असून त्याची प्रचिती पुरस्कार प्रदान करतेवेळी त्यांनी केलेल्या महाराष्ट्राच्या जयघोषातून आली. राम सुतार यांच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

राम सुतार मराठी माणसाचा मानबिंदू : शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की राम सुतार यांनी केवळ देशातच नव्हे तर जगभर शिल्पे उभारली आहेत. देशाचे स्टॅच्यूमॅन अशी त्यांची ओळख असून अनेक उंच पुतळे उभारणाऱ्या राम  सुतार यांच्यामुळे पुरस्काराचीच उंची वाढली आहे. प्रतिभावान ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असलेले राम सुतार हे मराठी माणसाचा मानबिंदू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »