dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन : हातात सिलिंडर घेऊन निदर्शने; मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

जालना :  घरगुती व व्यावसायिक गॅस दरवाढीच्या निषेधार्थ जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात काँग्रेस पक्षाने गुरुवार, 12 मार्च रोजी आक्रमक आंदोलन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात गॅस सिलिंडर घेऊन केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे काही काळ परिसरातील वातावरण तापले होते.

  अलीकडेच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे ६० रुपयांची तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे ११५ रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, गृहिणी तसेच छोटे-मोठे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावाचा परिणाम इंधन दरांवर होत असला तरी त्याचा बोजा सामान्य नागरिकांवर टाकणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “गॅस दरवाढ कमी करा”, “महागाई रोखा” अशा घोषणांद्वारे सरकारचा निषेध नोंदवला. यानंतर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गॅसच्या वाढीव किमती तात्काळ कमी कराव्यात तसेच घरगुती व व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, गॅस दरवाढ मागे घेतली नाही तर येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश अल्पसंख्यांक उपाध्यक्ष बदर चाऊस, सेवादल जिल्हाध्यक्ष इब्राहिम शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top