सिल्लोड : तालुक्यातील दोन विविध गावात वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह तिघांचा दुर्देवी मृत्यी झाल्याची घटना शनिवार, 14 जून रोजी घडली. वीज कोसळून गंभीर जखमी झालेल्या एका 21 वर्षीय तरुणांवर सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सिल्लोड : तालुक्यातील दोन विविध गावात वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह तिघांचा दुर्देवी मृत्यी झाल्याची घटना शनिवार, 14 जून रोजी घडली. वीज कोसळून गंभीर जखमी झालेल्या एका 21 वर्षीय तरुणांवर सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यश राजू काकडे, रोहित राजू काकडे, दोघे रा. सारोळा, ता. सिल्लोड, शिवाजी सतीश गव्हाणे (30 वर्ष), रा. पिंपळदरी, ता. सिल्लोड असे वीज कोसळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर जीवन सतीश गव्हाणे (21 वर्ष), रा. पिंपळदरी, ता. सिल्लोड असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. यश काकडे, रोहित काकडे हे दोघेही सख्खे भाऊ आपल्या आईसोबत सारोळा येथील गट नंबर 294 मध्ये असलेल्या शेतात पेरणी करीत होते. दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान अचानकपणे पाऊस सुरु झाल्याने दोघे भाऊ आणि त्यांची आई शेतातील झाडाच्या आडोशाला उभे होते. त्यावेळी अचानक वीज कोसळल्यामुळे यश काकडे व रोहित काकडे हे दोघेही बेशुध्द झाले होते. त्यांच्या आईने आरडा ओरड केल्यानंतर आजू-बाजूच्या शेतातील शेतकऱ्यांनी घटनास्थही धाव घेवून यश काकडे व रोहित काकडे यांना उपचारासाठी सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना तपासून मयत घोषित केले.
दुसऱ्या घटनेत, पिंपळदरी येथील शेतात शिवाजी गव्हाणे व त्यांचा सख्खा भाऊ जीवन गव्हाणे हे दोघे काम करीत होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानकपणे वीज त्यांच्या अंगावर कोसळल्याने शिवाजी गव्हाणे व जीवन गव्हाणे हे दोघेही बेशुध्द झाले होते. हा प्रकार शेतातील इतर मजूरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दोघांना उपचारासाठी सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी शिवाजी गव्हाणे यांना तपासून मयत घोषीत केले. तर जीवन गव्हाणे यांच्यावर उपचार सुरु आहेत.