जालना : जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशा मागणीचे निवेदन पालकमंत्री पंकजा मुंडेंना देण्यासाठी आलेल्या शेतकरी आंदोलकाला एका पोलिस अधिकाऱ्याने चक्क गचांडी धरून जमिनीवर पाडले. शनिवार, 14 जून रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हा प्रकार घडला.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी दुपारी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. ही बैठक पंकजा मुंडे अमरावतीकडे निघालेल्या असताना गजानन उगले हा शेतकरी निवेदन देण्यासाठी गेला होता. मात्र, एका साबळे नामक पोलीस अधिकाऱ्याने उगले यांना गचांडी धरून ढकलले. यामुळे उगले खाली पडले. त्यानंतर देखील पोलीस अधिकाऱ्याने उगले यांना सोडले नाही. त्यांना गर्दीतून ढकलून बाहेर नेले. यानंतर पोलिसांनी उगले यांना ताब्यात घेतले.