Animals seized in Buldhana: बुलढाण्यात जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडले: तीन जणांना अटक 

Animals seized in Buldhana

Animals seized in Buldhana: मध्यप्रदेशातून येणाऱ्या एका ट्रकमधून तब्बल १७ म्हशींची अवैध वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील जयस्तंभ चौकात १३ जून रोजी रात्री समोर आला. रात्री गस्त करत असताना शहर पोलिसांनी ही वाहतूक रोखली व आरोपीतांना ताब्यात घेवून कारवाई केली.

Animals seized in Buldhana

बुलढाणा : मध्यप्रदेशातून येणाऱ्या एका ट्रकमधून तब्बल १७ म्हशींची अवैध वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील जयस्तंभ चौकात १३ जून रोजी रात्री समोर आला. रात्री गस्त करत असताना शहर पोलिसांनी ही वाहतूक रोखली व आरोपीतांना ताब्यात घेवून कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार, १३ जून रोजी रात्री शहरातील काही नागरिकांनी जयस्तंभ चौकात एक आयशर ट्रक अडविला होता. यामध्ये, जनावरांची वाहतूक होत असल्याचे कळाल्यानंतर गस्तीवर असलेले शहर पोलिसांचे पथक याचवेळी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये एकूण १७ म्हशींना कोंबून ठेवण्यात आल्याचे दिसले. यातील एक जखमी म्हैस गंभीर अवस्थेत होती. पोलिसांनी तातडीने वाहन जप्त करत आरोपीतांना ताब्यात घेतले. अखिलेश प्रल्हाद विश्वकमो (40 वर्ष), शेख आलम शेख बाबु (45 वर्ष), शेख ईरफान शेख शफीक सर्व रा. मध्यप्रदेश अशी जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

२८.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

17 म्हशी (एकूण किंमत 18 लाख 50 हजार) व एक आयशर ट्रक (किंमत अंदाजे 20 लाख) असा एकूण 28 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या वाहनातील म्हशींना येळगांव येथील बुलढाणा अर्बन गोशाळा येथे सुरक्षिततेकामी ठेवण्यात आले असून, यातील एक मैस मरण पावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चापाईतकर करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »