भोकरदन : जाफ्राबादकडून भरधाव आलेल्या एका अज्ञात रिक्षाने अचानक दुचाकीला हुलकावणी दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका वृध्द महिलेचा मृत्य झाला, तर लेक व नातू जखमी झाले आहे. ही घटना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी दुपारी घडली. अपघातानंतर रिक्षा चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

सुशीलाबाई उमरराव शिंदे (75), रा. चोऱ्हाळा, ता. भोकरदन असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. रूग्णालयात किरकोळ उपचारासाठी लेक वंदना जाधव व नातु दीपक शिंदे हे सुशीलाबाई यांना घेवून मोटारसायकलवर भोकरदनला निघाले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असतांना पाठीमागून अचानक भरधाव रिक्षाने त्यांच्या मोटारसायकलला हुलकावणी दिली. यावेळी हॅन्डल गुंतल्यामुळे दुचाकी पलटी झाल्याने सुशीलाबाई रोडवर पडून गंभीर जखमी झाल्या. तर लेक व नातु किरकोळ जखमी झाले. सुशीलाबाई यांच्या डोख्याला जबर मार बसल्याने घटनास्थळीच काना मधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरु झाला. अपघातानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर, ज्या रिक्षाचालकाने दुचाकीला कट मारला, तो रिक्षाचालक घटनास्थळी न थांबता रिक्षासह तातडीने पसार झाला. रिक्षाचा क्रमांक किंवा चालकाची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे संतप्त जमावाने काही काळ चौकात गर्दी केली होती. या अपघाताची नोंद पोलीसांनी घेतली आहे.