dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जगदंबा माता यात्रा महोत्सवाचे आयोजन; १९ मार्चपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल

अकोलादेव : अनादी काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार, जाफ्राबाद तालुक्यातील अकोला देव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘जगदंबा माता यात्रा महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

अकोलादेव : अनादी काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार, जाफ्राबाद तालुक्यातील अकोला देव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘जगदंबा माता यात्रा महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९ मार्च रोजी महोत्सवाचा प्रारंभ आणि सोंगांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

यात्रा महोत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच गुरुवार, १९ मार्च रोजी सकाळी ७ वाजता गुढी उभारून उत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर देवीचा अभिषेक, देवीचा टोप व काठी मिरवणूक आणि दुपारी १ वाजता ‘आमली बारस’ मिरवणूक काढण्यात येणार आहे. विशेष आकर्षण म्हणजे रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत विविध देवाधिकांच्या सोंगांचे सादरीकरण होणार आहे, ज्यामध्ये झाडझूड सोंग, लिंबाड्या सोंग, शारजा गणपती, महादेव-पार्वती आणि रामायणातील विविध प्रसंगांचा समावेश असेल. यात्रेतील आकर्षण असलेला  रात्री ११ ते १ वाजेपर्यंत ग्रामपंचायत समोर वाघ्यामुरळी हा कार्यक्रम संपन्न होईल. पहाटे ४.३० ते ५ वाजता राम-रावण युद्ध आणि सोंगाच्या कार्यक्रमाने सांगता होईल. या महोत्सवासाठी गावातील रहिवासी, बाहेरगावी असलेले नागरिक आणि नवसाला पावणारी जगदंबा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जगदंबा संस्थान, जगदंबा उत्सव समिती आणि समस्त अकोला देव ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top