dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Sexual assault on a young woman:तरुणीवर लैंगिक अत्याचार; बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Sexual assault on a young woman: शहरातील एका निर्जनस्थळी एका तरुणीवर अत्याचाराची घटना १२ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी पिडीत तरुणीने १६ एप्रिल रोजी रात्री उशीरा बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Sexual assault on a young woman
Sexual assault on a young woman

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका निर्जनस्थळी एका तरुणीवर अत्याचाराची घटना १२ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी पिडीत तरुणीने १६ एप्रिल रोजी रात्री उशीरा बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरूद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपी शिवा सुखदेव साठे याने पीडितेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लेणीकडे जाणाऱ्या रोडने रस्त्याच्या बाजुला झाडी झुडूपात नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार 12 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडल्याचे पिडीतेने तक्रारीत सांगितले. या धक्क्यातून सावरत 16 एप्रिल रोजी पीडित तरुणीने बेगमपुरा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 376 अन्वये आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेवर करीत आहेत.

महिलेवर अनैसर्गिक अत्याचार

विद्यापीठातील घटना ताजी असतानाच सातारा पोलीस स्टेशन अतंर्गत येणाऱ्या एका भागात एका महिलेवर अनैसर्गिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, तिच्यावर वारंवार अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आले. शिवाय, शिवीगाळसह मारहाण करण्यात आल्याचा आरोपही पीडितेने तक्रारीत केला आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top