सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन; गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर :  देशाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर कोर्ट रुममध्ये माथेफिरु वकील राकेश किशोर यांनी केलेल्या हल्ल्याच्या निर्षधार्थ शहर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने मंगळवार, 7 ऑक्टोबर रोजी राकेश किशोर यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. जोडे मारो आंदोलन करुन राकेश किशोर यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.

देशाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर कोर्ट रुममध्ये माथेफिरु वकील राकेश किशोर यांनी सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी हल्ला केल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने खा. डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली शहागंज परिसरातील गांधी भवन येथे राकेश किशोर यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, डॉ. जफर अहमद खान, माजी आमदार नामदेव पवार, मोहन देशमुख, सय्यद अक्रम, भाऊसाहेब जगताप, डॉ. निलेश आंबेवाडीकर, जयप्रकाश नन्नावरे, सूर्यकांत गरड, अनिस पटेल, अतिश पितळे, भास्कर घायवट, मोईन इनामदार, योगेश थोरात, शेख अथर, लतीफ पटेल, मुदस्सर अन्सारी, हेमा पाटील, अनिता भंडारी, चंद्रप्रभा खंदारे, नीता भालेराव, उषा खंडागळे, जोसेफ फर्नांडिस, अरुण शिरसाट, अस्मत खान, शेख कैसर बाबा, रमेश काळे, सय्यद फैयाजुद्दीन, प्रमोद सदाशवे, शेख जाफर, शाहिद खान, जसबीरसिंग सोदी, सय्यद शाहेबाज कादरी, हरप्रीतसिंग मुछाल, नजीर फारुकी, नदीम शेख, सय्यद फराज, संघटन महासचिव विशाल बन्सवाल यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर कोर्ट रुममध्ये माथेफिरु वकील राकेश किशोर यांनी केलेला हल्ला हा लोकशाहीवरील झालेला हल्ला असल्याचे खा. डॉ. कल्याण काळे यांनी यावेळी सांगितले. देशातील न्यायव्यवस्थेवर होणारे अशा प्रकारचे हल्ले असाह्य असून यामागील जबाबदार घटकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. जे संविधानाचे रक्षण करतात, तेच अन्यायाविरुध्द उभे राहतात आणि त्यांच्यावरच उच्चवर्णीय मानसिकतेचे लोक असे भ्याड हल्ले करतात असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगांवकर यांनी सांगितले. तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »