dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अवैध वाळू वाहतुक करणारे चार टिप्पर जप्त; महसूल, पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई

अकोलादेव : जाफ्राबाद‌ तालुक्यातील आळंद शिवारात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत चार टिप्पर जप्त केले. ही कारवाई उपविभागीय अधिकारी  बी. सरवनन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पथकाने शुक्रवारी आळंद शिवारात अचानक धाड टाकून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे चार टिप्पर पकडले. जप्त करण्यात आलेली वाहने पुढील कायदेशीर कारवाईसाठी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. संबंधितांवर गौण खनीज कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाची धडक कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे उपजिल्हाधिकारी बी सरवनन यांनी स्पष्ट केले. या कारवाईमध्ये जाफ्राबाद‌चे तहसीलदार अविनाश लोडे, भोकरदनचे तहसीलदार काकडे,  टेंभूर्णी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक  कैलास भारती, पोलिस कर्मचारी अतिश चौधरी, संजय  बेडवाल, म्हस्के, फुलमाळी, ग्राम महसूल अधिकारी बी.जी.ब्राम्हणे, अमोल मुरकुटे, प्रभाकर शेणेवाड, रवींद्र वैद्य, माधव साळवे, अक्षय यळवंते व राजू खांडेभराड यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top