सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मंगरुळपीर वकील संघाने ठेवले कामबंद 

मंगरूळपीर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश  भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंगरूळपीर तालुका वकील संघाने ठराव घेऊन ७ ऑक्टोबर रोजी कामकाज बंद ठेऊन  निषेध व्यक्त केला.

मंगरूळपीर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश  भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंगरूळपीर तालुका वकील संघाने ठराव घेऊन ७ ऑक्टोबर रोजी कामकाज बंद ठेऊन  निषेध व्यक्त केला.

सदर ठरावात नमूद आहे की सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती  यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्याची घटना अत्यंत खेदजनक आणि निंदनीय आहे. न्यायसंस्थेचा सन्मान आणि स्वायत्तता हे भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत, आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या पवित्र संस्थेवर अशा असभ्य आणि अमानवीय कृत्याला कोणताही न्याय नाही. वकील संघाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून, अशा कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची मागणी केली आहे.  यावेळी, तातडीच्या बैठकीत सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला की वकील बांधवांनी या निंदनीय घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहावे. त्यामुळे मंगरूळपीर तालुका वकील संघाने कामकाज संपूर्ण दिवसासाठी बंद ठेवले.

सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थित वकीलांमध्ये ॲड. आर. एस. पांडे, ॲड. एम. ए. बोलके, ॲड. जी. बी. राठी, ॲड. बी. एम. ठाकरे, ॲड. प्रमोद बनसोड, ॲड. ए. एन. मुले, ॲड. एस. आर. जाखोटिया, ॲड. पी. आर. बंग, ॲड. रवींद्र टोपले, ॲड. वैभव बेलोकार, ॲड. आर. एस. खडसे, ॲड. बलराज शृंगारे, ॲड. मनोज वरघट, ॲड. अजय गवारगुरु, ॲड. अलीम शेख, ॲड. अजय भगत, ॲड. किशोर चव्हाण, ॲड. फैजान राजा यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »