कैकाडी समाजाला एस.टी. प्रवर्गात आरक्षण द्या; कैकाडी समाजाच्या बैठकीत एकमुखी मागणी

छत्रपती संभाजीनगर :  कैकाडी समाजाला न्यायापासून वंचित ठेवलेले आहे. हा समाज आर्थिक शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या आजही मागासलेला आहे. हा समाज आजही डाले विणणे, टोपले विणणे आदी व्यवसाय करून आपली उपजीविका भागवत आहे. या समाजाला शिक्षणापासून दूर राहावे लागले आहे. समाजाची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय असून समाजाचा शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकास व्हावा तसेच त्यांचे जीवनमान उंचावे यासाठी राज्य शासनाने कैकाडी समाजाला एस.टी. प्रवर्गात आरक्षण द्यावे अशी एकमुखी मागणी गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी कैकाडी सामाज संघटनेच्या बैठकीत करण्यात आली.

कैकाडी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी संपन्न झाली आहे. कैकाडी समाजाचे महाराष्ट्रात दोन प्रवर्गामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. तर विदर्भात हा समाज अनुसूचित जातीमध्ये गणल्या जातो. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कैकाडी समाज व्ही.जे.एन.टी. प्रवर्गात (विमुक्त जमातीमध्ये) मध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे कैकाडी समाजाला अनुसूचित जातीचे लाभ मिळत नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. नॅशनल कमिशन फोर डी नोटिफाइड नॉमेडीक अँड सेमी नॉमेटिक ट्राईब्स (मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अँड एम्पॉवरमेंट 2015 नुसार कैकाडी समाजाची एस.टी. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी शिफारस करण्यात आली आहे. व सदर शिफारस केंद्राकडे पाठविण्यात आली आहे. परंतु त्यावर अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आली आहे. हैद्राबाद गॅझेटनुसार कैकाडी समाजाला एस.टी. अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे अशी मागणी यावैळी करण्यात आली. 

या बैठकीस महाराष्ट्र कैकाडी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, सचिव पोपटराव गायकवाड, बाबु पवार, रोहिदास जाधव, प्रा. विष्णू जाधव, नारायण पवार, पप्पू जाधव, युवक सचिव विक्की जाधव, ज्ञानेश्वर मेंडके, शिवनारायण गायकवाड, शिवाजी गायकवाड, विष्णू जाधव, उध्दव गायकवाड, हर्षकुमार गायकवाड, श्रीकांत मेंडके, खंडू जाधव, सूरज गायकवाड, विष्णू जाधव, विष्णू पहेलवान, खंडू जाधव, रामेश्वर माने, एस.एल. गायकवाड, सुभाष जाधव, रवींद्र गायकवाड, उध्दव गायकवाड आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांना दिले मागण्यांचे निवेदन

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले असता त्यांना कैकाडी समाज संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन बुधवार, 17 सप्टेंबर रोजी देण्यात आले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »