श्री गणेशयाग व वरूण यागाने गजानन महाराज पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात : पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

शेगाव :  श्री संत गजानन महाराजांचा 115 वा पुण्यतिथी उत्सवनिमित्त  24 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पाच दिवस दररोज श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 28 ऑगस्ट रोजी हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्रींच्या पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

शेगाव :  श्री संत गजानन महाराजांचा 115 वा पुण्यतिथी उत्सवनिमित्त  24 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पाच दिवस दररोज श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 28 ऑगस्ट रोजी हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्रींच्या पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

श्रींच्या मंदिरात पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज सकाळी 6 ते 6.45 काकडा, सकाळी 7.15 ते 9.15 भजन, दुपारी 4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 5.30 ते 6 हरिपाठ रात्री 8 ते 10 हरी किर्तन, 24 ऑगस्ट रोजी ह.भ.प. सुरेश बुवा वाकडे रा. पुसद 25 ऑगस्ट रोजी ह.भ.प. भरत बुवा जोगी रा.परळी, 26  ऑगस्ट रोजी ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते रा. शिरसोली, 27 ऑगस्ट रोजी ह. भ. प. भरत बुवा पाटील रा. म्हैसवाडी 28 ऑगस्ट रोजी ह भ प बाळू बुवा गिरगावकर रा.गिरगाव तसेच 28 ऑगस्ट वार गुरुवार रोजी ह.भ.प. भरत बुवा पाटील म्हैसवाडीकर यांचे सकाळी 7 ते 9 श्रींचे समाधी सोहळ्या निमित्त कीर्तन होणार आहे. या उत्सवात श्री गणेश यागास व वरूण यागास 24 ऑगस्ट रोजी आरंभ होऊन 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. यागाची पुर्णाहूती व अवभृतस्नान श्रीचे ब्रम्हवृंद यांच्या उपस्थितीत होईल तर दुपारी उत्सवाची पालखीचे श्रींच्या रजत मुखवट्याचे पुजन होऊन श्रींच्या पालखीचे रथ, मेणा, पताका टाळकरी, अश्वासह परिक्रमा निघेल. सायंकाळी मंदिरात श्रींची महाआरती व टाळकरी यांचा आकर्षक रिंगण सोहळा व श्रींची आरती होणार आहे. 

दि.29 ऑगस्ट रोजी ह.भ.प.प्रमोद बुवा राहणे पळशी यांचे सकाळी 6 ते 7 काल्याचे कीर्तन होईल व नंतर दहीहंडी गोपाळकाला यांच्या कार्यक्रम होणार आहे. श्रींचे पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरावर व परिसरात  रंगबेरगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.सर्वत्र मंदिर परिसरात केळीचे खांब व आंब्याच्या पानांचे तोरण लावण्यात येवून भक्तीमय वातावरण असून श्रींच्या नामघोषात भक्त तल्लीन होत महाराष्ट्रातील मराठवाडा, खानदेश, विदर्भसह मध्ये प्रदेशातील भजनी दिंड्यांचा ज्ञानोबा तुकाराम यांच्या नामघोष करीत संत नगरीत  श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात सहभागी होत आहेत.

उत्सवामध्ये भक्तांसाठी श्रींचे दर्शनाकरिता एकेरी मार्गची व्यवस्था

भक्तांच्या सोयीसाठी श्रींचे दर्शनसाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रींचे दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता ही भक्तांना श्रींच्या प्रति आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे. भक्तांना कोणताही त्रास होवू नये, यास्तव श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत. या उत्सव काळात सर्वतोपरी सोयीसुविधा संस्थानच्यावतीने पुरविल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »