dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जालना येथील खून प्रकरणाचा उलगडा; आरोपी अटकेत

माहोरा : शहरात १० जून रोजी घडलेल्या एका अनोळखी पुरुषाच्या खून प्रकरणाचा जालना पोलिसांनी यशस्वीरित्या उलगडा केला आहे. सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला अटक करून गुन्ह्याची उकल केली.

      शहरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. अज्ञात आरोपीने गळा आवळून तसेच डोक्याच्या पाठीमागील बाजूस काहीतरी वस्तूने मारून त्यास जखमी करून ठार केले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष गंगाराम जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून अज्ञात आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अज्ञात आरोपीची ओळख पटली. नाव आबासाहेब विठ्ठलराव घोडके ( ५८,   रा. भवानीनगर, जालना ) असे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान, मयताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.  रामेश्वर दत्ताराव पवार ( २८, रा. लक्ष्मीनारायणनगर, नांदेड ) असे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top