अंबड :शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी माजीमंत्री बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ आता मनोज जरांगे मैदानात उतरणार आहेत.

अंबड :शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी माजीमंत्री बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ आता मनोज जरांगे मैदानात उतरणार आहेत.
बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ रविवार, 15 जून रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत जरांगे यांनी स्वतः आवाहन केले आहे. सर्व शेतकऱ्यांनी एक दिवसांचे काम बाजूला ठेऊन चक्काजाम आंदोलनात सहभागी व्हावे, असे मनोज जरांगे म्हणाले. 15 जून रोजी बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या आणि मागण्यांच्या समर्थनार्थ राज्यभरात शेतकरी संघटनांकडून चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे जालन्यातील पैठण फाट्यावरील चक्का जाम आंदोलनात कडू यांच्या समर्थनार्थ जरांगे देखील स्वतः रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांनीही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जरांगे यांनी केले आहे.