जुन्या वादातून माजी उपसरपंचाला मारहाण ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल 

चिखली : जुन्या वादाच्या कारणावरून एकाने  मकरध्वज खंडाळा येथील माजी उपसरपंचाला मारहाण करत शिवीगाळ केल्याची घटना 11 जून रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.  याप्रकरणी चिखली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चिखली : जुन्या वादाच्या कारणावरून एकाने  मकरध्वज खंडाळा येथील माजी उपसरपंचाला मारहाण करत शिवीगाळ केल्याची घटना 11 जून रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.  याप्रकरणी चिखली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 माजी उपसरपंच गणेश ठेंग (40 वर्ष) रा. मकरध्वज खंडाळा, ता. चिखली यांच्या तक्रारीनुसार, 2018 मध्ये गावातील उमेश ठेंग व अक्षय उदावंत या दोघांमध्ये पैशाच्या व्यवहारावरुन वाद झाले होते.  त्यावेळी गणेश ठेंग यांनी मध्यस्थी करून वाड सोडविला होता. याच कारणावरून,  11 जून 2025 रोजी रात्री महाबिज समोरील योगायोग हॉटेल समोर अक्षय उदावंत याने त्यांचाशी वाद घातला. यावेळी ठेंग यांच्याबरोबर  पुरुषोत्तम कदम, राजेंद्र माळोदे, गोपाल भवरे हे देखील हजर होते. “तुमच्यामुळे उमेश ठेंग माझे पैसे देत नाही” असे म्हणत अक्षय उदावंत याने  शिवीगाळ करून ठेंग यांच्याडोक्यावर पेंचीस मारली. यामुळे, चक्कर आल्याने ते खाली कोसळले. तरीही अक्षय याने लाथा बुक्यांनी मारहान केली व जिवाने ठार मारण्याची धमकी दिली, त्याच्यामुळे जीवीतास धोका निर्माण झाल्याचे ठेंग यांनी तक्रारीत म्हटले आहे. यावरून, पोलिसांनी अक्षय उदावंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »