परतूर : येथील कोठाळकर हॉस्पिटलचे डॉ.अर्जुन साबळे यांनी अटॅक आलेल्या तरुणावर यशस्वीपणे उपचार केल्याने बंद पडलेले हृदय पुन्हा धडधडू लागले. तरूणास जिवदान मिळाल्याने डॉक्टर साबळे यांच्याबाबत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

परतूर : येथील कोठाळकर हॉस्पिटलचे डॉ.अर्जुन साबळे यांनी अटॅक आलेल्या तरुणावर यशस्वीपणे उपचार केल्याने बंद पडलेले हृदय पुन्हा धडधडू लागले. तरूणास जिवदान मिळाल्याने डॉक्टर साबळे यांच्याबाबत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
सालगाव येथील एका २७ वर्षाच्या तरुणाला हृदय विकाराचा झटका आल्याने त्याला परतूर येथील कोठाळकर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. डॉ. साबळे यांनी त्याच्यावर तात्काळ यशस्वीपणे उपचार केल्याने तरुणाला जीवदान मिळाले. अन् तरुणाचे बंद पडलेले हृदयाचे ठोके पुन्हा धडधडू लागले. या तरुणाला हृदय विकाराचा झटका आल्याने रूग्णाची प्रकृती नाजूक झाली होती, यावेळी डॉक्टरांनी त्यांचे कौशल्य पणाला लावून या तरुणाचे प्राण वाचविले. यावेळी मृत्युच्या दाढेतून बाहेर आलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून सर्वांना आनंद वाटला. तरुणाला आलेल्या हृदय विकाराच्या झटक्याची प्रत्यक्षात परिस्थिती पाहणाऱ्यांनी सुध्दा डॉक्टरांच्या कौशल्याचे कौतूक केले आहे. तसेच प्रत्यक्ष मृत्यूला समक्ष पाहिल्याची प्रतिक्रिया दिली. तर डॉ. साबळे यांच्यामुळे तरुणाला पुनर्जन्म मिळाल्याची प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली आहे. तसेच डॉक्टरांनी आपले कौशल्य पणाला लावून केलेल्या उपचाराचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.
तरुणाला हायपर ॲक्यूट मायोकार्डियल इन्फार्कशन, हृदयाचा तीव्र अटॅक होता. त्यामुळे आपत्कालिन आयसीयू मध्ये ॲडमिट केले. व थ्रम्बो लाईज करून जीव जाण्याच्या धोक्याच्या बाहेर काढले. नंतर अन्जियोग्राफी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
– डॉ. अर्जुन साबळे परतूर
