सभासदांना सन्मानाने कर्ज मिळाले पाहिजे  : सुरेश देवकर : अदिती अर्बनच्या 65 व्या शाखेचा पुसद येथे थाटात शुभारंभ  

वाशिम : ‘सहकार दिसायला सोपा वाटतो, पण त्यात विश्वास कमावणं सर्वांत कठीण असतं. शब्द दिला तर पाळलाच गेला पाहिजे, वेळेवर मिळणारा पैसा अनमोल असतो. सभासदांना सन्मानाने कर्ज मिळाले पाहिजे, हेच अदिती अर्बनचे ध्येय आहे,’ अशा शब्दांत संस्थापक अध्यक्ष सुरेश देवकर यांनी आपल्या प्रवासाचा ध्यास मांडला.

वाशिम : ‘सहकार दिसायला सोपा वाटतो, पण त्यात विश्वास कमावणं सर्वांत कठीण असतं. शब्द दिला तर पाळलाच गेला पाहिजे, वेळेवर मिळणारा पैसा अनमोल असतो. सभासदांना सन्मानाने कर्ज मिळाले पाहिजे, हेच अदिती अर्बनचे ध्येय आहे,’ अशा शब्दांत संस्थापक अध्यक्ष सुरेश देवकर यांनी आपल्या प्रवासाचा ध्यास मांडला.

 २४ ऑगस्ट रोजी पुसद येथे अदिती अर्बनच्या 65 व्या शाखेचा शुभारंभ थाटात करण्यात आला.  अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष सुरेश देवकर होते. उद्घाटन दूध तंत्रज्ञान महाविद्यालय, वरुडचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत वासनिक यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण पुणेचे से.नि.उपसंचालक माधव वैद्य, शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दिगंबर जगताप, मुख्याध्यापक किरण देशमुख, बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष संग्राम देशमुख त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये उपाध्यक्ष दिनकरराव चिंचोले म्हणाले की, अदिती अर्बनचे बुलढाणा येथे बीजारोपण झाले. नंतर महाराष्ट्रभर जाळ पसरलं. आज 65 व्या शाखेचा शुभारंभ होत आहे. अदिती अर्बनने सहकार क्षेत्रात  एक विश्वास निर्माण केला. देवकर सरांचे कुशल नेतृत्व आहे. सहकारातूनच विकास साधता येतो. राज्यस्तरीय शाखा असल्याने कुठेही आपल्याला व्यवहार करता येत असल्याचे दिनकरराव चिंचोले म्हणाले. कार्यक्रमाला संचालक सुशील पनाड, संजय जाधव, ऍड. राजेश देवकर, शैलेंद्र मुळे, अभिजीत पाटील, प्रा. राजू वैद्य, दैनिक महाभूमिचे कार्यकारी संपादक  ब्रह्मानंद जाधव, समाधान गवई, प्रथम काळे, अविनाश इंगळे, प्राचार्य पवार,  सचिन बावस्कर, प्रदीप पडघाण, भारत अंभोरे, शाखा व्यवस्थापक ओम निकम आदी उपस्थित होते. कार्यक्रमात ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेते अंकुर वाढवे यांनी विशेष हजेरी लावली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश इंगळे यांनी केले. आभार समाधान गुंजकर यांनी मानले.

अदिती अर्बनला मोठे  करण्यात सामान्य माणसाचा मोठा वाटा : देवकर

पुढे बोलताना सुरेश देवकर यांनी आठवणींना उजाळा देत सांगितले, सुरुवातीला दररोज १५-२० लोकांना भेटत होतो. अनेकांनी नकार दिला, क्रॉस केलं; पण संयम सोडला नाही. लोकांची सेवा करण्याची वृत्ती आणि चुका मान्य करून त्यातून शिकणं या गुणांनी अदिती अर्बन वाढली. ते पुढे म्हणाले, संस्थेला राजकारणापासून दूर ठेवले आहे. ठेवीदाराचा पैसा मागितला तेव्हा मिळालाच पाहिजे, हीच आमची हमी आहे. अदिती अर्बन मोठं करण्यात सामान्य माणसाचा मोठा वाटा आहे. मी मित्र जोडणारा माणूस आहे, ह्याच भरवशावर ही बँक उभी आहे. 

ठेवीदारांची विश्वासार्ह पतसंस्था’ 

मुख्याध्यापक किरण देशमुख म्हणाले की, पुसदमध्ये सहकार क्षेत्र बहरलेलं आहे. अदिती अर्बन लवकरच १ हजार कोटी ठेवींवर पोहोचेल आणि ठेवीदारांची विश्वासार्ह पतसंस्था म्हणून  नावलौकिकास आली आहे. यावेळी दिगंबर जगताप यांनीही शिक्षक म्हणून काम करताना सहकारात पाऊल ठेवून संस्था स्थापन करणे सोपं नाही. देवकर सरांची धडपड अभिमानास्पद आहे. ठेवीदारांसाठी उत्तम पर्याय उपलब्ध झाला असून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असे मत व्यक्त केले. दरम्यान, माधव वैद्य यांनी ‘सहकार चळवळ विश्वासावर टिकते’ असे सांगितले. अदिती अर्बनच्या ६५ शाखा म्हणजे लोकांचा विश्वास असून देवकर सरांसारख्या इमानदार व्यक्तीच्या मागे सर्वांनी ठामपणे राहावं, असे आवाहन केले.

अदिती अर्बनचा प्रवास  प्रेरणादायी -डॉ प्रशांत वासनिक 

एका शिक्षकाने सहकारातून एवढं मोठं काम उभं केलं, ही प्रेरणादायी गोष्ट आहे. शिक्षक वर्ग फक्त शिक्षणापुरते मर्यादित न राहता समाजाच्या आर्थिक प्रगतीतही मोलाचं योगदान देऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अदिती अर्बन. बचत आणि सहकारातूनच खऱ्या अर्थाने प्रगती साधता येते. पुसदमधील नागरिक आणि विशेषत: शिक्षक वर्गासाठी ही संस्था वरदान ठरेल, याची मला खात्री आहे, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. प्रशांत वासनिक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »