Vidhan Sabha Election 2024: उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ६५ उमेदवारांची घोषणा; बुलढाण्यातून जयश्री शेळके, बाळापुरात पुन्हा नितीन देशमुख

Vidhan Sabha Election 2024

Vidhan Sabha Election 2024:  उध्दव ठाकरे शिवसेना गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 65 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

Vidhan Sabha Election 2024
एड. जयश्री शेळके

मुंबई : उध्दव ठाकरे शिवसेना गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 65 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून जयश्री शेळके, मेहकर विधानसभा मतदारसंघातून सिध्दार्थ खरात यांना उमेदवारी देण्यात येत आहे. बाळापुरात पुन्हा एकदा नितीन देशमुख यांना संधी देण्यात आली आहे.

Vidhan Sabha Elections 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून कोपरी – पाचपाखडी मतदारसंघातून केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघात माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Vidhan Sabha Elections 2024

चाळीसगावातून माझी खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून जयश्री शेळके, मेहकर विधानसभा मतदारसंघातून सिध्दार्थ खरात यांना उमेदवारी देण्यात येत आहे. बाळापुरात पुन्हा एकदा नितीन देशमुख यांना संधी देण्यात आली आहे.

Vidhan Sabha Elections 2024

 

छ. संभाजीनगरमध्ये यांची लागली वर्णी

परभणीत राहुल पाटील, कन्नड मतदारसंघात उदयसिंह राजपूत, सिल्लोड मतदारसंघात सुरेश बनकर, छ. संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात राजू शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर संभाजीनगर मध्यमधून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »