dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

भोकरदन पोलीस ठाण्यात महिला शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन 

भोकरदन : तालुक्यातील जवखेडा ठोंबरे गावातील शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून व्यापाऱ्याने पैसे न देताच धूम ठोकली. याबाबत भोकरदन पोलिसांना तक्रार देऊनही पोलिसांनी व्यापाऱ्यांवर कोणतीही कारवाई न केल्याने महिला शेतकरी संतप्त झाल्या. संतप्त महिलांना शुक्रवार, 30 मे रोजी भोकरदन पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून पोलिसांच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त केला. 

    जवखेडा येथील शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून पैसे न देता फरार झालेल्या व्यापाऱ्याचे नाव 

पवन बिलगे असे आहे. त्याबाबत भोकरदन पोलिसांना तक्रार देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून 

संतप्त महिला शेतकऱ्यांनी भोकरदन पोलीस ठाणे गाठून ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलक महिलांनी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलीस आणि आंदोलक महिला यांच्यात बाचाबाची देखील झाल्याचे सांगण्यात आले. फरार व्यापाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी या महिला शेतकऱ्यांनी केली. यावेळी व्यापाऱ्याला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील महिलांनी  केला.

दरम्यान, या व्यापाऱ्याने वकिलामार्फत आठ दिवसात तुमचे पैसे देतो, असे आश्वासन दिल्यानंतर महिला शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याचे सांगण्यात आले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top