Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Chhatrapati Sambhajinagar: लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका मतमोजणी केंद्रावर कॉलिंग एजंट यांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळेच येथे गोंधळ निर्माण झाला. दुसरीकडे मात्र कार्यकर्ते आतमध्ये जाण्यास आग्रही आग्रही आहेत.
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका मतमोजणी केंद्रावर कॉलिंग एजंट यांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळेच येथे गोंधळ निर्माण झाला. दुसरीकडे मात्र कार्यकर्ते आतमध्ये जाण्यास आग्रही आग्रही आहेत. पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना आतमध्ये सोडण्यास नकार दिला. त्यामुळे येथे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पण शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत हा गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न केला.
मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या काही मिनिटांमध्येच येथे गोंधळ झाला आहे. या गोंधळाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र गोंधळाची स्थिती निर्माण होताच, येथे पोलिसांनी हस्तक्षेप करत गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न केला.