Lok Sabha Elections: विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात होणार १९ एप्रिलला मतदान

Lok Sabha Elections

Lok Sabha Elections: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये 19 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

Lok Sabha Elections
Lok Sabha Elections

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये 19 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 10,652 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत 95,54,667 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी बॅलेट युनिट (बीयु) 21,527 तर कंट्रोल युनिट (सीयु) 13,963 आणि 14,755 व्हीव्हीपॅट उपलब्ध असून 97 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके उपस्थित होते. यावेळी माहिती देताना चोक्कलिंगम म्हणाले, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 97 उमेदवार लढत आहेत. या निवडणूकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन ) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच गडचिरोली मतदारसंघात सात हॅलिकॉप्टर पाठविण्यात आले आहेत. यंत्रणा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीसाठी सज्ज असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. गडचिरोली-चिमुर (अज) या लोकसभा मतदार संघातील आमगांव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी या चार विधानसभा मतदारसंघात व भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघातील अर्जुनी मोरगांव एका विधानसभा मतदारसंघात अशा एकूण पाच विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय तयारीची माहिती खालीलप्रमाणे
मतदार संघाचे नाव – मतदान केंद्रे –  उमेदवारांची संख्या – बॅलेट युनिट – कंट्रोल युनिट – व्हीव्हीपॅट
रामटेक               –  2405          –  28                         –  5904         –   3283         –  3372
नागपूर                –  2105          –   26                         –  5165          –   2874          – 2951
भंडारा-गोंदीया     – 2133           –  18                          –  5518          –  2866           -3097
गडचिरोली-चिमूर – 1891          –  10                          –  2330         –   2330          –  2517
चंद्रपूर                 – 2118            – 15                           – 2610          –   2610           – 2818

———————————————————————————————-
एकूण        –          10,652        –  97                          – 21,527          –  13,963         – 14,755

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »