dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जुनी पेन्शनसाठी शिक्षक भारतीचा काळ्या फितीने निषेध

शेगाव : देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा होत असताना, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी शिक्षक भारतीने केली आहे. ही मागणी नैसर्गिक न्यायाला धरून असून, जुनी पेन्शन मिळणे हा पात्र कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे, असे शिक्षक भारती शेगाव तालुकाध्यक्ष नितीन वाढे यांनी सांगितले.

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी

शेगाव : देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा होत असताना, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी शिक्षक भारतीने केली आहे. ही मागणी नैसर्गिक न्यायाला धरून असून, जुनी पेन्शन मिळणे हा पात्र कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे, असे शिक्षक भारती शेगाव तालुकाध्यक्ष नितीन वाढे यांनी सांगितले.

शासनाने पात्र असूनही संबंधित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाकारल्याचा आरोप शिक्षक भारतीने केला आहे. या मागणीसाठी संघटना पूर्वीपासून प्रयत्नशील असून, शासनाकडे वेळोवेळी निवेदने देऊनही अद्याप गंभीर दखल घेतली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी नंतर शंभर टक्के अनुदानावर आले. मात्र, त्यांना टप्पा अनुदान मिळाले नाही. यात कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नसून, पात्र शिक्षकांना विहित मुदतीत टप्पा अनुदान देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे शिक्षक भारतीचे म्हणणे आहे. राज्यातील हजारो पात्र शिक्षक आजही जुनी पेन्शनपासून वंचित असल्याने, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नितीन वाढे यांनी दिली.

काळ्या फिती लावून निषेध

या पार्श्वभूमीवर शेगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी ५ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून कामकाज करीत शासनाचा निषेध नोंदवणार आहेत, अशी माहिती नितीन वाढे यांनी निवेदनाद्वारे दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top