dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मालेगाव शहराजवळ अपघात :  उभ्या ट्रकवर कार आदळली;  तरुण व्यावसायिकाचा मृत्यू

मालेगाव : अकोला-नांदेड महामार्गावर मालेगाव शहराजवळ उभ्या असलेल्या ट्रकला कारची पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात शिरपूर येथील ‘दीपक भोजनालय’चे संचालक दीपक लक्ष्मण भांदुर्गे (वय ३१) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (२७ जुलै) पहाटे एका पेट्रोल पंपासमोर घडली.

दीपक भांदुर्गे हे वाशिम येथे एका विवाह समारंभासाठी गेले होते. समारंभ आटोपल्यानंतर पहाटे शिरपूरकडे परतत असताना त्यांच्या कारची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य करून त्यांना बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. दीपक भांदुर्गे हे शांत, मनमिळाऊ व सामाजिक स्वभावासाठी परिसरात परिचित होते. शिरपूर येथील त्यांच्या ‘दीपक भोजनालय’च्या माध्यमातून त्यांनी अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. गरजू व्यक्तींना परवडेल त्या दरात किंवा प्रसंगी विनामूल्य जेवण देण्याची त्यांची उदार वृत्ती सर्वश्रुत होती. त्यांच्या अकाली निधनाने शिरपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दीपक भांदुर्गे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक लहान मुलगी व अन्य नातेवाईक असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे भांदुर्गे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top