dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

दिल्लीच्या जंतर-मंतर येथील आंदोलनाला टेंभुर्णीतून पाठिंबा

टेंभुर्णी :  देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि दिल्लीत आंदोलनाला बसलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी बुधवार, 22 जुलै रोजी टेंभुर्णी शहर ‘कडकडीत बंद’ पाळण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी आणि स्थानिक व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या या ‘गाव बंद’च्या हाकेला संपूर्ण गावातून १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कडकडीत बंद : तहसीलदारांना दिले निवेदन

टेंभुर्णी :  देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि दिल्लीत आंदोलनाला बसलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी बुधवार, 22 जुलै रोजी टेंभुर्णी शहर ‘कडकडीत बंद’ पाळण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी आणि स्थानिक व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या या ‘गाव बंद’च्या हाकेला संपूर्ण गावातून १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बुधवारी सकाळपासूनच टेंभुर्णीतील मुख्य बाजारपेठ, सर्व लहान-मोठी दुकाने, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद ठेवली. वैद्यकीय सेवा आणि औषधांची दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळता गावात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. नेहमी गजबजणाऱ्या मुख्य चौकांमध्ये बुधवारी पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. नीट परीक्षेमधील प्रचंड गैरव्यवहार आणि पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी टेंभुर्णीकरांनी यावेळी केली. 

दरम्यान, भ्रष्ट व्यवस्थेत तातडीने सुधारणा व्हावी, यासाठी सोनम वांगचुक दिल्लीमध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या न्याय्य लढ्याला बळ देण्यासाठी आणि लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी टेंभुर्णीतील नागरिक एकत्र आले होते. तहसीलदारांमार्फत सरकारला निवेदन आंदोलकांच्या वतीने सादर करण्यात आले. पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला जावा आणि सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर सरकारने त्वरित तोडगा काढावा, अन्यथा भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही टेंभुर्णी येथील ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top