dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

हर्षलची अनोखी कलाकारी; खडूवर साकारली आषाढी वारी

वाशिम : वाशिमच्या कलावैभवात भर घालणारे युवा कलाकार हर्षल हिवसे यांनी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी अवघ्या एका खडूवर विठ्ठल-रुक्मिणी आणि आषाढी वारीचे प्रतीकात्मक शिल्प साकारत भक्ती आणि कलेचा सुंदर संगम घडवून आणला आहे. त्यांच्या या सूक्ष्म कलाकृतीला भाविक आणि कलारसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सूक्ष्म शिल्पकलेतून विठ्ठल-रुक्मिणी आणि वारकरी परंपरेचे दर्शन

वाशिम : वाशिमच्या कलावैभवात भर घालणारे युवा कलाकार हर्षल हिवसे यांनी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी अवघ्या एका खडूवर विठ्ठल-रुक्मिणी आणि आषाढी वारीचे प्रतीकात्मक शिल्प साकारत भक्ती आणि कलेचा सुंदर संगम घडवून आणला आहे. त्यांच्या या सूक्ष्म कलाकृतीला भाविक आणि कलारसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

टिळक चौक येथील रहिवासी असलेले हर्षल हिवसे हे खडूवर सूक्ष्म शिल्प साकारण्याच्या कलेसाठी ओळखले जातात. अत्यंत लहान आकाराच्या खडूवर विविध देवी-देवतांच्या प्रतिमा कोरण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे. यापूर्वी त्यांनी अष्टविनायक गणपती, विठ्ठल-रुक्मिणी, चामुंडादेवी, नागावर शिवलिंग तसेच भगवान येशू ख्रिस्त यांचीही आकर्षक शिल्पे साकारून रसिकांची दाद मिळविली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या नव्या कलाकृतीत विठ्ठल-रुक्मिणीसह वारकरी परंपरेचे दर्शन घडते. या शिल्पातून भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा भाव जिवंत झाल्याचे पाहणाऱ्यांना जाणवते. हर्षल यांची वाशिम येथील ऐतिहासिक पद्मतीर्थ परिसरातील श्री पद्मेश्वर मंदिराशी विशेष नाळ जुळलेली आहे. ते नियमित मंदिरात सेवा बजावत असून प्रत्येक सोमवारी होणाऱ्या महाआरतीसाठी शिवपिंडीचा आकर्षक शृंगार करतात. श्रावणातील सोमवार, महाशिवरात्री, कार्तिकी एकादशी यांसारख्या धार्मिक उत्सवांत त्यांच्या शृंगारकलेचे विशेष आकर्षण असते.

खडूवरील शिल्पकलेची अनोखी ओळख

हर्षल हिवसे यांनी यापूर्वी अष्टविनायक गणपती, विठ्ठल-रुक्मिणी, चामुंडादेवी, नागावर शिवलिंग, भगवान येशू ख्रिस्त आदींची सूक्ष्म शिल्पे खडूवर साकारली आहेत. पद्मेश्वर मंदिरातील शिवपिंडीचा आकर्षक शृंगार हीदेखील त्यांच्या कलेची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. त्यांच्या कलाकृतीतून भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि भक्तीभावाचे दर्शन घडत असून, त्यांच्या या अनोख्या कलासाधनेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कलागुण दडलेले असतात. ते ओळखून जोपासले तर मानसिक समाधानासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्यही चांगले राहते. माझ्या या सूक्ष्म शिल्पकलेची देशपातळीवर दखल घ्यावी आणि शासनाने या कलेला प्रोत्साहन देऊन राजाश्रय द्यावा, हीच अपेक्षा आहे. 

– हर्षल हिवसे, युवा कलाकार, वाशिम

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top