dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

भरधाव ट्रकची विजेच्या खांबाला धडक; जीवितहानी टळली

अकोलादेव :  जाफ्राबाद ते जालना मुख्य रस्त्यावरील गणेशपूर फाटा येथे बुधवार, 22 जुलै रोजी भरधाव ट्रकने रस्त्यालगत असलेल्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या खांबाला धडक दिली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. दरम्यान, नियम धाब्यावर बसवून अत्यंत धोकादायक पद्धतीने उभारण्यात आलेल्या या विद्युत वाहिनीमुळे भविष्यात थेट एसटी किंवा खासगी बसचा अपघात होऊन मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मौजे अकोला देव तांडा येथे ५० एकरावर नवीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पातून टेंभूर्णी सबस्टेशन साठी नेण्यात येणारी विद्युत वाहिनी अतिशय निष्काळजीपणे जाफ्राबाद ते जालना मुख्य रस्त्याच्या अगदी जवळून नेण्यात आली आहे. सौर उर्जा प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने लाईन टाकताना रस्त्याच्या कडेची अनेक झाडे बेकायदेशीरपणे तोडून टाकली आहेत. तसेच धोकादायक भूमिगत लाईन उच्च दाबाचा वीज प्रवाह केवळ एक फूट खोल नाली काढून जमिनीत गाडल्या गेल्या आहेत. त्यासाठी कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केलेली नाही असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, या धोकादायक वीज वाहिनीचा मार्ग तातडीने बदलावा, यासाठी अकोला देव येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान सवडे यांनी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असिमा मित्तल यांना थेट ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहे. तसेच खासदार डॉ. कल्याण काळे आणि आमदार संतोष पाटील दानवे यांच्याकडेही ही वाहिनी दुसऱ्या मार्गाने हलवण्याची मागणी केली आहे. गणेशपूर फाट्यावरील या अपघातामुळे नागरिकांचा उद्रेक झाला असून, जिल्हाधिकारी आणि महावितरण प्रशासन या गंभीर प्रकाराची दखल घेऊन कंत्राटदारावर कारवाई करणार का ? आणि ही वाहिनी सुरक्षित शिवरस्त्याने वळवणार का ? याकडे संपूर्ण जाफ्राबाद तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top