dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जांब येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

परभणी :  तालुक्यातील जांब येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन शनिवार, 6 जून रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन शनिवारी जांब येथे साजरा करण्यात आला. जांब येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रदीप रेंगे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रल्हाद रेंगे पाटील, मुंजाजी रेंगे पाटील, माणिकराव रेंगे पाटील, प्रभाकर रेंगे पाटील, रंजीत रेंगे पाटील, प्रसाद रेंगे पाटील, रोहिदास रेंगे पाटील, भागवत भालेराव, दिगंबर जमरे, विठ्ठलराव रेंगे पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top