पुणे : राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे गुरूवारी निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

पुणे : राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे गुरूवारी निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान, अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनंतराव थोपटे हे पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते. भोर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले होते. अनंतराव थोपटे अनेक वर्षे राज्य मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री होते. ते पुण्याचे पालकमंत्री देखील राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर थोपटे काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते होते. पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढण्यात थोपटे यांचे मोठे योगदान होते. माजी आमदार आणि भाजपचे नेते संग्राम थोपटे यांचे ते वडिल होत.