dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पत्रकारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा

अकोलादेव  :  जालना येथील पत्रकार संतोष भुतेकर यांच्यावर गुटखा माफियांनी मंगळवार, 2 जून रोजी हल्ला करुन मारहाण केली होती. या घटनेमुळे जाफ्राबाद तालुक्यातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

अकोलादेव  :  जालना येथील पत्रकार संतोष भुतेकर यांच्यावर गुटखा माफियांनी मंगळवार, 2 जून रोजी हल्ला करुन मारहाण केली होती. या घटनेमुळे जाफ्राबाद तालुक्यातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील दोषी आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी टेंभुर्णी येथील पत्रकार संघाच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड यांच्याकडे करण्यात आली आहे. 

अवैध धंद्यांचे वाभाडे काढणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून गुटखा माफियांनी हे कृत्य केले असल्याचा आरोप पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर असे हल्ले होणे ही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर केवळ नेहमीच्या कलमांऐवजी ‘पत्रकार संरक्षण कायद्या’अंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात पत्रकार सुनील भाले, रावसाहेब अंभोरे, पी. जी. तांबेकर, नसीम शेख, संजय राऊत, गजानन देठे, बी. डी. सवडे, अलकेश सोमाणी, बालाजी शेवाळे, साबेर शेख, फकरू कुरेशी, गजानन शेळके, सुनील जोशी, आशपाक शेख, आशिष पैठणे, शेख इमरान, शेख गफुर, शेख असद, भिकन खाँ पठाण आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top