dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक; दोघे गंभीर

मालेगाव  : समृद्धी महामार्गावरील अमाणी महामार्ग पोलीस केंद्र हद्दीत बुधवारी पहाटे ट्रॅव्हल्स बसची अज्ञात ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात चालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले, तर पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. 

मालेगाव  : समृद्धी महामार्गावरील अमाणी महामार्ग पोलीस केंद्र हद्दीत बुधवारी पहाटे ट्रॅव्हल्स बसची अज्ञात ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात चालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले, तर पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले.  मिळालेल्या माहितीनुसार, एमपी २० झेडव्ही ०६६३ क्रमांकाची ट्रॅव्हल्स नागपूरहून पुण्याकडे जात होती. समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरच्या चॅनल क्रमांक २२३+४०० जवळ समोर चालत असलेल्या अज्ञात ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने ट्रॅव्हल्सची त्याला जोरदार धडक बसली. या अपघातात ट्रॅव्हल्स चालक मोहन उयेके व क्लिनर रणजीत हे गंभीर जखमी झाले असून पाच ते सहा प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अमाणी महामार्ग पोलीस केंद्राचे हवालदार अजय दाभाडे, पोलीस कर्मचारी नंदकिशोर तसेच एमएसएफ जवान घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन शंभरच्या लेनमध्ये अडकल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.  या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती  प्रभारी अधिकारी नितीन कुमार दांदडे यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top