dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अपघातात पतीचा मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

वैजापूर :  सासरवाडीहून धोंडा जेवणाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून घरी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित युवकाचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शिवूर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर स्वामीराज मंगल कार्यालयाजवळ मंगळवार, 2 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद मच्छिंद्र आहेर (३० वर्ष), रा. नारळा, ता. वैजापूर असे या घटनेतील मयत युवकाचे नाव आहे. तर त्याची पत्नी रुपाली प्रमोद आहेर ही या अपघातात गंभीर जखमी झाली. प्रमोद हा पत्नीसह कन्नड तालुक्यातील शेवता येथे धोंड्याचे जेवण जेवणासाठी गेला होता. जेवण झाल्यानंतर दोघेही पती-पत्नी दुचाकीवर घरी परतत असताना टॅंकरला पाठीमागून दुचाकी धडकली. या अपघातात प्रमोद आहेर, रुपाली आहेर हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. 

जखमींना उपचारासाठी वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी प्रमोद आहेर यांना तपासून मृत घोषित केल. तर रुपाली आहेर यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top